चर्चासत्र: इंटरनेट वेब साईट्स्, ब्लॉग्ज आणि अन्य सोशल नेट वर्किंग साईट्स् या आधुनिक माध्यमांतून मराठी भाषा आणि साहित्याचा प्रसार गेल्या दशकापासून होत आहे. अत्यंत कमी खर्चात आणि वेळात इ-मेल, वेब साईट्स्, ब्लॉग्ज आणि अन्य सोशल नेट वर्किंग साईट्स् यातील मराठी मजकूर जगात पसरू शकतो. कोणालाही आपले विचार आणि मते यांच्या अभिव्यक्तीसाठी हे पूर्णपणे लोकशाही व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
या माध्यमांत वापरण्यात येत असलेली भाषा, विषयांचे वैविध्य, तंत्रज्ञानाची व्याप्ती आणि मर्यादा, कायदेविषयक प्रश्न आदी विषयांची दखल साहित्याच्या अभ्यासकांनी आणि संस्थांनी घेतली पाहिजे. अ. भा. साहित्य संमेलनात या विषयांची चर्चा होणे आवश्यक आहे. यासाठी मार्च २०१० मध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनातील एक सत्र "आधुनिक माध्यम तंत्र न आणि मराठी भाषा व साहित्य" या विषयासाठी राखून ठेवावे अशी सूचना म.सा.प.ची ही कार्यकारिणी करीत आहे. या चर्चासत्राचा तपशील व वक्ते याबाबत अंतिम स्वरुप देण्यासाठी श्री/श्रीमती ............ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, असा निर्णय ही कार्यकारिणी घेत आहे.
पारितोषिके: इंटरनेट वेब साईट्स्, ब्लॉग्ज आणि अन्य सोशल नेट वर्किंग साईट्स् या आधुनिक माध्यमांतून मराठी भाषेत ललित आणि वैचारिक साहित्याची निर्मिती मोठया प्रमाणात होत आहे. या साहित्याची दखल म.सा.प. आणि मराठी महामंडळाच्या संलग्न संस्थांनी घेणे आणि प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने मराठीत केलेल्या वेब साईट्स् आणि ब्लॉग्ज या वरील उत्तम कथा, कविता आणि वैचारिक लेखन आदी प्रकारांना म.सा.प. ने पारितोषिके द्यावी. या विषयीचा तपशील, मापदंड आणि नियम निश्चित करण्यासाठी श्री/श्रीमती ............ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, असा निर्णय ही कार्यकारिणी घेत आहे.
शुद्धलेखन आणि तपशील दुरुस्त करून द्यावा ही विनंती:
विकीपीडिया: विकीपीडिया या इंटरनेटवरील ज्ञानकोषाच्या विभागात इंग्रजीखेरीज फ्रेंच, रशियन, स्पॅनिश आदी भाषांतून संदर्भ साहित्य मोठया प्रमाणात सातत्याने उपलब्ध होत आहे. त्या तुलनेत भारतीय भाषा मागे आहेत. महाराष्ट्राचे साहित्य, मराठी भाषा, इतिहास, भूगोल आणि अन्य बाबीं संबंधी म.सा.प. ने पुढाकार घेतला पाहिजे. या विषयांवर संदर्भ साहित्य मराठीत निर्माण तर झाले पाहिजेच, पण इंग्रजीतही ते उपलब्ध होणे आवश्यक आहे. या साठी दीर्घ कालिन योजना आखून त्यासाठी निधी आणि संस्थात्मक यंत्रणाही उभी राहाणे आवश्यक आहे. त्यासाठी तपशीलवार योजना आखून महाराष्ट्र शासन, सेवाभावी संस्था, आणि आस्थापने आदींच्या मदतीने ज्ञानकोषाच्या कामाला सुरुवात करावी. अशा उपक्रमात आस्था असणाऱ्या व्यक्ती आणि शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आदी क्षेत्रातील संस्था यांच्या मदतीने म.सा.प. ने या कामास सुरुवात करावी. या साठी पुढील समिती नियुक्त करण्यात येत आहे: .....