अशोक कोठावळे
महाराष्ट्र टाइम्स सहा सप्टेम्बर २००९
नर्मदा परिक्रमेची परंपरा आपल्या देशात फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. साधू, संत, ऋषी, मुनी यांनी आध्यात्मिक/धामिर्क कार्यासाठी ही परिक्रमा केली. नर्मदेची परिक्रमा केल्याने तिच्या सान्यिध्यात पाप वृत्तींचा नाश होतो, अशी एक पारंपरिक समजूत आहे. या समजुतीचा आधार घेऊन काही लोक ही परिक्रमा करीत असतात, तर काही लोक नर्मदेचा सुंदर किनारा, किनाऱ्यावरची जंगलं, विस्तीर्ण होत जाणारे नर्मदेचे पात्र आणि परिक्रमा करीत असताना सातत्याने भेटणाऱ्या सामान्य जनतेची आतिथ्यशीलता या अनुभवांसाठीही जात असतात. ही परिक्रमा करीत असताना सर्वसामान्य व्यक्तीलाही चमत्कार वाटावेत, असे काही अनुभव येत असतात. अशा अनुभवांसाठीही ही नर्मदा परिक्रमा काही वेळा केली जाते. मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली असं मानलं जातं. नर्मदेचं वर्णन अगदी प्राचीन काळापासून लिखित स्वरूपात उपलब्ध आहे.
स्कंदपुराणात नर्मदेचं वर्णन आढळतं. अलीकडच्या साहित्यात 'माते नर्मदे' हे दत्तप्रसाद दाभोलकर यांचं नर्मदा परिक्रमेवरचं पुस्तक अतिशय गाजलं. ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दाण्डेकर यांचं 'कुणा एकाची भ्रमणगाथा' हे नर्मदा परिक्रमेवरचं पुस्तक म्हणजे त्यांनी या परिक्रमेच्या काळात आत्मशोधाचा केलेला प्रयत्न वाटतो. वास्तवाला ललित रूप देऊन त्यांनी नर्मदा परिक्रमेतले आपले अनुभव मांडले आहेत. सत्याच्या, चिरंतनाच्या शोधासाठी केलेला हा प्रवास आहे. या परिक्रमेत नर्मदेचे पाणी 'अतिदेखणे' वाटते. खोल विस्तीर्ण पात्र आपले क्षुदत्व दाखवून देते. देवळे, लोक, संस्कृती यातून साक्षीभावाने वाहणाऱ्या नर्मदेचे विशाल रूप आपणांस या कादंबरीतून दिसते. या नर्मदा परिक्रमेत लेखकाला भेटलेली 'यशोदा' कोण विसरू शकेल? गोनीदांच्या रसाळ शैलीमुळेही ही कादंबरी अतिशय भावते.
जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' हे पहिल्या तीन नर्मदा परिक्रमांवरील आणि 'साधनामस्त' हे चौथ्या परिक्रमेवरील अशी दोन पुस्तकं सध्या उपलब्ध आहेत. अतीव आंतरिक आचेमुळे आपण ही परिक्रमा केली, असे कुंटे यांनी पुस्तकात नमूद केले आहे. ध्यान, प्राणायाम यांना त्यांनी आपल्या या परिक्रमेत महत्त्व दिले आहे. गुरुकृपेमुळे उच्च कोटीचे अनुभव प्राप्त करतात येतात, असा त्यांचा विश्वास आहे. त्यांच्याशी गुरुमाऊली बोलतात, नर्मदामाई त्यांना आज्ञा करते, चमत्कार वाटावेत असे अनुभव ते घेतात, या परिक्रमेत अश्वत्थामा त्यांना भेटतो, हे सगळे अनुभव इतरांना थापा वाटतील, असंही त्यांनी नमूद केलं आहे. पण गूढ, अर्तक्य वाटतील असे अनेक अनुभव ते या परिक्रमेच्या दरम्यान अनुभवतात. परिक्रमावासीयांचे जीवन, वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तींची भेटलेली माणसे, जंगलदऱ्यांतून प्रवास करताना आलेले अनुभव, कष्ट, लूटमारीला तोंड देणे अशा अनेक गोष्टींची ओळख ते या दोन पुस्तकांतून आपणांस करून देतात. ही परिक्रमा एक साधना, व्रत म्हणून ते करतात. अतिशय विलक्षण अनुभव देणारी नर्मदा परिक्रमेवरील ही दोन पुस्तके वाचकालाही अनुभवसमृद्ध करतात.
'नर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा' हे भारती ठाकूर यांचं अलीकडचं पुस्तक. स्वत: लेखिका भारती ठाकूर, निवेदिता खांडेकर आणि उष:प्रभा पागे या तीन मैत्रिणींनी केलेल्या या पदयात्रेतील काही ठळक नोंदींवर आधारित आहे. ही पदयात्रा करताना त्यांनी पाहिलेला/अनुभवलेला निसर्ग, त्यांना भेटलेली माणसं, त्यांनी केलेलं सहकार्य, या प्रवासातील महत्त्वाच्या घटना, प्रसंग यांविषयीचं लेखन इथे येतं. या पुस्तकाच्या मनोगतात लेखिकेनं म्हटलं आहे की, 'निसर्ग-अर्थात नर्मदा खोऱ्यातलं पर्यावरण याखेरीज आणखी काही कारणं (माझ्या नर्मदा परिक्रमेला) होती. तिथलं लोकजीवन बघता यावं, आणि नर्मदा किनाऱ्यावरून मार्गक्रमणा करत असताना स्वत:चा स्वत:शीच संवाद घडावा ही त्यांपैकी आनुषंगिक कारणं. पण या साऱ्या कारणांचा मी नर्मदा परिक्रमेहून परतल्यानंतर पुन्हा विचार करते तेव्हा हीच कारणं मला सबबी वाटू लागतात. नर्मदा परिक्रमेची इच्छा ही केवळ एक अंत:प्रेरणा होती- तो योग माझ्या भाग्यात होता हेच खरं.''
नर्मदा परिक्रमा करीत असताना देहाला अतिशय कष्ट पडतात. फार सामान वाहून नेऊ शकत नाही, त्यामुळे सदाव्रत (शिधा मागणे) मागूनच उदरनिर्वाह करावा लागतो. अर्थात शहरी संस्कार झालेल्या तिघींना सुरुवातीला हे सर्व अवघड वाटलं. पण नंतर त्यातली अपरिहार्यताही लक्षात घ्यावी लागली. नर्मदा किनाऱ्यावरचे शेतकरी, आदिवासी अगदी किनाऱ्यावरचे नावाडीही हे सदाव्रत देतात. ज्यांच्या घरात दुसऱ्या दिवसाची भ्रांत असायची तेही आनंदाने सदाव्रत देतात. स्वामी अर्ध्यानंदानी लेखिकेला त्यांचा सदाव्रत स्वीकारण्यातला संकोच घालविण्यासाठी सांगितलं ते असं की, 'तुम्ही ज्याला भिक्षा मानता त्याला ती देणारा सदाव्रत मानतो. ते घेताना तुम्हाला भलेही संकोच वाटो, देणाऱ्याला मात्र आनंद होत असतो. 'वसुधैव कुटुंबक्रम'चा अनुभव तुम्ही या प्रथेतून घेत असता. मी, माझी सांपत्तिक स्थिती, शिक्षण, सामाजिक प्रतिष्ठा... वगैरे जो अहंभाव मनात असतो, तो गळून पडण्यास या प्रथेनं मदत होते.
नर्मदेची विविध रूपं या पुस्तकातून त्या त्या नोंदीच्या रूपानं उलगडली आहेत. माणुसकीची विविध रूपं या प्रवासात त्यांना अनुभवायला मिळाली. चमत्कार अनुभवायला आले नाहीत, पण नर्मदातीरी प्रकट केेलेली इच्छा पूर्ण होते, याचा अनुभव त्यांना बऱ्याचदा येतो. एखादी गोष्ट हवीशी वाटणं आणि पुढल्या प्रवासात ती मिळणं असं बऱ्याचदा घडतं.
हा प्रवास निश्चितच सहजसाध्य नाही. पण उत्कट इच्छेनं सर्व अडचणींवर मात केली. रस्ता अत्यंत कठीण-जंगलातून जाणारा, निर्मनुष्य, खडबडीत. वस्तीसाठी एखाद्या आश्रमात, धर्मशाळेत अगदी एखाद्या अडगळीच्या खोलीतही मुक्काम करावा लागणं, तीन स्त्रियांनीच मिळून केलेला हा प्रवास किती धाडसी आणि कसोटी पाहणारा वाटू शकेल याचा प्रत्यय इथे येत राहतो. मात्र या परिक्रमेत कुठलेही विपरीत वाट्याला न येता, ही नर्मदा परिक्रमा सफळ, संपूर्ण होते. एक नवा अनुभव त्यांना देते.
हा सर्व अनुभव लेखिकेनं सखीशी केलेल्या हितगुजाच्या स्वरूपात मांडला आहे. हे हितगुज म्हणजे लेखिकेचा अंतर्मनाशी झालेला संवाद आहे. या सखीच्या रूपाने जे हितगुज लेखिका करते, त्यातून तिच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचाही अनुभव आपण घेतो. हा सर्व प्रवास वाचनीयच आहे.
नर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा - भारती ठाकूर, गौतमी प्रकाशन, नाशिक, पृष्ठे २६१, मूल्य : २०० रुपये.